कुरवरपूर, मंत्रालयम, पिठापूर, अण्णावरम, विशाखापट्टणम

श्रीपाद वल्लाभांची जन्मभूमी व तपोभूमी

२ डिसेंबर २०२४

पुणे रेल्वे स्टेशन वरून रात्री १० च्या रेल्वेने मंत्रालयमकडे प्रस्थान.

२ डिसेंबर २०२४

सकाळी ६.३० वा.   मंत्रालय  रेल्वे स्टेशन वर उतरून हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन राघवेंद्र स्वामींचे दर्शन करून मंत्रालयाकडे निघणे.अंदाजे १ तासाचा प्रवास करून मंथनगोड मधील श्रीपाद वल्लभांचे दर्शन करून रात्री ८ वाजता आपण आश्रम मध्येपोहचून रात्रीचे जेवण करून मुक्काम.

२ डिसेंबर २०२४

पहाटे ठीक ५ वा.उठून अंघोळ करून आपण श्रीपाद श्रीवल्लभयांची कर्म भूमी असलेल्या मंदिराला भेट देणार आहोत. पहाटे ५.३० वा.गाडीने कृष्णा नदी तीरावर जाऊन गोलबोटीने आपण मंदिराकडे जाणार आहोत. मंदिरामध्ये पोहचल्यावर तेथे सामुदायिक अभिषेकाचा कार्यक्रम करण्यात येईल. मंदिरामध्ये स्त्रियांना फक्त साडी आणि पुरुषांना सोहळेआणि पंचा घालूनच मंदिर प्रवेश दिलाजातो याची नोंद घ्यावी. सामुदायिक अभिषेक झाल्यावर आपण पुन्हा बोटीने परत स्वामींच्या आश्रमात येऊन दुपारचे जेवण करून लगेच वाडीकडे निघणे. संध्याकाळी ४ वाजता वाडीमध्ये पोहोचून संध्याकाळच्या ५ च्या रेल्वेने पिठापुरकडे निघणे.

२ डिसेंबर २०२४

पिठापूर  – सकाळी ८ वाजता पिठापुर रेल्वे स्थानकावर उतरून रिक्षाने आपण श्रीपाद श्रीवल्लभांची जन्म भूमी असलेले मंदिराकडे कडे निघणार आहोत.अंदाजे१० मिनिटाचा प्रवास करून मंदिरामध्ये पोहचून संस्थानाच्या रूम किंवा हॉल मध्ये उतरून अंघोळ करूनआपण दुपारचे जेवण करून अण्णावरमकडे निघणार आहोत. अण्णावरममध्ये श्री सत्यनारायणाचे मंदिर दर्शन करून आपण संध्याकाळी पिठापूरमध्ये परत येऊन संध्याकाळी ६ वाजता पालखी प्रदक्षिणेचा आनंद घेऊन मंदिरामधील महाप्रसाद घेऊन रात्री पिठापूर मधील रूम मध्ये मुक्काम करणार आहोत.

२ डिसेंबर २०२४

सकाळी नाष्टा करून मंदिरा मधील अभिषेक कार्यक्रम आटोपूनदुपारचे जेवण करून आपण पिठापूर मधील धार्मिक स्थळांचे दर्शन करून संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा करून रात्रीचे जेवण करून मुक्काम.

२ डिसेंबर २०२४

सकाळी नाष्टा करून आपण विशाखापट्टणम कडे निघणे. दुपारी विशाखापट्टणम मध्ये पोहोचून  संपूर्ण दिवसभर विशाखापट्टणम मधील धार्मिक स्थळांचे दर्शन घेणार आहोत.रात्रीचे जेवण करून रात्री ११.३० च्या विशाखापट्टणम एक्स्प्रेसने पुण्याकडे निघणार आहोत.

२ डिसेंबर २०२४

संपूर्ण दिवसभर रेल्वे प्रवास. रात्री १२.३० वाजता पुणे पोहोच व सहल समाप्त.

सहल खर्चात समाविष्ट असलेल्या बाबी -:

  • पुणे ते पुणे नॉन एसी रेल्वे प्रवास तिकीटा सहित.
  • एसी रेल्वे प्रवास पाहिजे असेल तर २,५००/- रुपये जास्त लागतील.
  • प्रवासाकरिता गाडी. (सभासद संख्येनुसार)
  • सदर सहलीत रेल्वे प्रवास वगळता मुक्कामाच्या ठिकाणी २ वेळा शुद्ध शाकाहारी भोजन, १ वेळेचा नाष्टा व ३ वेळा चहा.
  • निवास व्यवस्थाहॉटेलमध्ये असेल.

सहल खर्चात समाविष्ट नसलेल्या बाबी-:

  • रेल्वे प्रवास 3 एसी तिकीट / विमान खर्च.
  • रेल्वे प्रवासातील चहा, नाष्टा व भोजन.
  • रेल्वे स्टेशन मधील हमाली.
  • प्रेक्षणीय स्थळे, दर्शनाची प्रवेश फी घोडा,डोली ,तिकीट खर्च. वैयक्तिक खर्च(उदा: कॅमेरा,लॉन्ड्री, टेलिफोन,इंटरनेट, रिक्षा ,बोट)
  • वरील कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतो.
महत्वाची सूचना :-
  • यात्रेचा एकुण खर्च १४,५००/- रुपये प्रती प्रवासी राहील.
  • अडवान्स रक्कम ५०००/- जमा करून आपली सीट राखीव करावी.
  • बाकी रक्कम यात्रेच्या १० दिवस आगोदर जमा करावी
  • यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडवान्स परत मिळणार नाही पण बदली प्रवासी चालेल ( अटी लागू )
  • सहलीमध्ये जेवण हे साध्या हॉटेलमध्येच असेल, धार्मिक ठिकाणच्यादिवशी संस्थानामधील जेवण असेल.
  • या मध्ये संपूर्ण रेल्वे प्रवास हा रेल्वेच्या स्लीपर क्लासने होईल. 3AC रेल्वे प्रवास पाहिजे असेल तर २५००/- रुपये जास्त लागतील.
  • स्थळ दर्शनासाठी नॉन एसी गाडी असेल.
  • दररोज एक पाण्याची बाटली दिली जाईल.
  • रेल्वेप्रवासातील चहा, पाणी, नाष्टाआणि जेवण स्वखर्चाने करावा याची नोंद घ्यावी.
  • मुक्काम हाडबल किंवा ट्रिपल शेरिंग असेल याची नोंद घ्यावी.
  • कुरवपुर मधील मुक्काम हा डबल शेरिंग मध्ये असेल.
  • पिठापूरमधील मुक्काम हा डबल किंवा ट्रिपल शेरिंग नुसार असेल.
  • सहलीमध्ये उत्कृष्ट आणि जास्तीत जास्तसुविधा देण्याचा आमचाप्रयत्न असतोच.
ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी लवकर आधार कार्ड आणि प्रत्तेकी १००००/- तिकिटासाठी जमा करावे

रद्द करण्याचे धोरण –
कोणत्याही टाळता येण्याजोग्या/अपरिहार्य कारणास्तव टूर/प्रवास सेवा रद्द केल्यास आम्हाला याची लेखी सूचना दिली पाहिजे. रद्द करण्याचे शुल्क आम्हाला लेखी सल्ला मिळाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रद्द करण्याचे शुल्क खालीलप्रमाणे असेल: –
रद्दीकरण शुल्क –
1. बुकिंगनंतर केव्हाही पण निघण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी: रु.२,५००/- किंवा एकूण टूर/सेवा खर्चाच्या ५%.
2. निर्गमन तारखेच्या ६० दिवस ते ४५ दिवस आधी: एकूण टूर / सेवा खर्चाच्या २५ %.
3. प्रस्थान तारखेच्या ४४ दिवस आणि २२ पूर्वीच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या ४०%.
4. निर्गमनाच्या तारखेपासून २१ दिवसांच्या दरम्यान: एकूण टूर / सेवा खर्चाच्या १००%.
5. १००% कॅन्सलेशन चार्जेसच्या बाबतीत, एअर तिकिटाच्या किंमतीसह भरलेले सर्व शुल्क याचा अर्थ आणि त्यात समावेश आहे असे मानले जाते आणि १००% रद्दीकरण शुल्काच्या बाबतीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.

संपर्क : चैतन्य ट्रॅव्हल्स, नवी सांगवी.

प्रशांत कामठे९८८१५४८२३९ / ९०२८३४१०४१

आशिष – ७८७५४९०४७८

ऑफिस – ९२०९८६०५९२

Scroll to Top